Latest News

6/recent/ticker-posts

सर्वर डाऊन रेशन धान्य वितरण ठप्प ... सततच्या सर्वर डाऊन मुळे मशिन शासनाकडे जमा आंदोलन.

सर्वर डाऊन रेशन धान्य वितरण ठप्प ... सततच्या सर्वर डाऊन मुळे मशिन शासनाकडे जमा आंदोलन.


देवणी :( ता. प्रतिनिध/विक्रम गायकवाड) दि. 5 पुरावठा विभाग मंत्रालयातुन 50 रुपये मार्जिन रक्कम वाढ करण्याच्या प्रस्थाव वित्त विभागाकडे पाठविलेले प्रस्थाव तात्काळ मंजूर करावेत. सततच्या सर्वर डाऊन मूळे रेशन चे धान्य वाटप बंद झाले. या मुळे व्यतित होऊन रेशन ची मशिन जमा करण्याचे आंदोलन यावेळी करण्यात येऊन विविध मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

देवणी तालुक्यातील रास्त भाव दुकानदार यांनी शासनाकडे इ पॉज मशीन जमा करायचे आंदोलन करून पुरवठा विभाग मंत्रालयातून 50 रुपये तूर्त कमिशनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवलेला असून वित्त विभागाने तात्काळ 50 रुपये वाढ करून मंजुरी द्यावेत. रेशन दुकानदार यांना शासना कडून kyc करण्यासाठी सेवाचार्ज दिले जात नाही. प्रती kyc साठी रास्त भाव दुकानदार ची मागणी आहे की, कमीत कमी 50 रुपये प्रति kyc ला द्यावेत. सर्वर डाऊन असल्याकारणाने नाहक्क त्रास सहन करावे लागत आहे. शासनाने सर्वर तात्काळ दुरुस्त करून द्यावेत. अनेक वेळा दिलेल्या निवेदनावर कोणतेही कार्यवाही केले जात नाही. तसेच मार्जिनची रक्कम प्रती महा देण्यात यावेत. यावेळी नितीन देशमुख रास्त भाव संघटना तालुका अध्यक्ष, भगवान सावंत महासचिव, बाबासाहेब वाघमारे तालुका उपाध्यक्ष, आर. पी. गोंडगाव कोषाध्यक्ष, रोहित पडसलगे, राजेंद्र जाधव, चेअरमन तोंडारे दिलीप जवळगा, मनोहर लांडगे, राजकुमार साबणे, चेअरमन विलास कदम शांताबाई मसगले, चेअरमन अंकुश बागवाले,  बलभीम घोडके, गोपाळ कारभारी, प्रमोद माने लासोना, बिजापूर यल्लाप्पा दुर्गाप्पा, माधव तेलंगे, जी एस शेळके आनंदवाडी, चेअरमन विनोद बिरादार सावरगाव, माधव तेलंगे इंद्राळ, बि. डी. तुरवाले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments