विद्यार्थ्यांनी प्रगती करत देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान व्हावे - मीनल करणवाल
लोहा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथे जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भेट दिली. पंचायत समिती लोहा येथील सुसज्ज व सुंदर कार्यालय पाहणी केल्यानंतर त्यांचा धावता ताफा शाळेकडे येताच प्रवेशद्वारावर पुष्पसुमनांची उधळण करीत वाद्यांच्या गजरात त्यांचे शाळेच्या चिमुकल्यांनी हसतमुखाने स्वागत केले. एरव्ही साहेब आले म्हणल्यास विद्यार्थी व शिक्षकांची तारांबळ उडते.. परंतु शिस्तबध्द पध्दतीने मॅडमचे वाद्यांच्या तालावर स्वागत करण्यात आले. हे पाहून त्या भारावून गेल्या... वाद्य पथकातील विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली.
शाळेचा परिसर पाहून त्यांच्या तोंडून सुंदर शाळा असे गौरव उदगार बाहेर पडले. आत येताच त्यांनी सोबत आणलेले शैक्षणिक साहित्य ज्यात प्रति विद्यार्थ्यांना रजिस्टर, स्केच पेन बॉक्स, शूज जोडी, लेखणी साहित्य दिले. विशेष म्हणजे पंचायत समिती लोहा येथे कसलाही सत्कार न स्वीकारता विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे अवाहान त्यांनी केले. साहित्य वाटप करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले मनोगत मांडताना अपेक्षा व्यक्त केली की या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे FLN वर भर द्यावा तसेच हे विद्यार्थी एवढे मोठे व्हावेत की एक दिवस ते राष्ट्रपती पदावर विराजमान व्हावे. तसेच शाळेतील सहशिक्षीका सौ.सी पी गंगाखेडकर ह्या महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होत आहेत हे समजताच करणवाल मॅडम यांनी त्यांचा सत्कार करून गौरव केला व उर्वरीत आयुष्य निरामय सुखदायक जावे म्हणुन शुभेच्छा दिल्या. करणवाल यांच्यासह ताफ्यात उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्कावार, लोहा पंचायत समिती चे गटविकासाधिकरी अडेराघो, गटशिक्षणाधिकारी सतिष व्यवहारे, शिक्षण विस्ताराधिकारी सरस्वती अंबलवाड,घरकुल प्रमुख दिनेश तेलंग, केंद्रप्रमुख बी जी फसमले, डी आर शिंदे, सुभाष पानपट्टे, कदम बी जी, विठ्ठल डिकळे, मुख्याध्यापक किसवे एम एल, फारुख शेख, देशमुख जी एल, सौ. कदम जे ए, सौ. गंगाखेडकर सी पी, इंगोले एस एस, सौ कदम आर जी व प्रा. बालाघाटे डी पी यांची उपस्थिती होती.


0 Comments