माझं लातूर परिवाराच्या वतीने ५ हजार तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण
लातूर : हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शासनाच्या अभियानांतर्गत माझं लातूर परिवाराच्या वतीने शहरात ५ हजार तिरंगा ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले.
शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविता यावा, देशाच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होता यावे या उद्देशाने हनुमान चौक येथे १४ ऑगस्ट २०२४ बुधवार रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण करण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कुटुंबातील महिला सदस्यांना घरावर ध्वज फडकविण्याचा मान द्यावा तसेच ध्वजासोबत सेल्फी घेऊन www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. हनुमान चौक येथे पार पडलेल्या मोफत तिरंगा ध्वज वितरण सोहळ्यात शहर वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक गणेश कदम, माझं लातूर परिवाराचे सतिश तांदळे, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, गोपाळ झंवर, शिलरत्न सोनवणे, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, उत्तम लोंढे यांच्या हस्ते नागरीकांना ध्वज वितरीत करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र गट्टानी, प्रितेश भंडारी, सोमनाथ मेदगे, जाकेर सय्यद, नरेश घंटे, दत्तराम कराड यांच्यासह माझं लातूर परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments