Latest News

6/recent/ticker-posts

अंगणवाडी समोरील धोकादायक लोखंडी पोल काढण्याची भादेकरांची मागणी

अंगणवाडी समोरील धोकादायक लोखंडी पोल काढण्याची भादेकरांची मागणी


बी डी उबाळे 

औसा: तालुक्यातील भादा येथील अंगणवाडी समोर उभा असलेला लोखंडी पोल हा धोकादायक असून तो  त्वरीत काढण्याची मागणी पालक आणि नागरिकाकडून केली जात आहे.

तालुक्यातील भादा येथील आनंदनगर भागामध्ये अंगणवाडी क्रमांक सहा च्या समोर एक वीज वितरण कंपनीचा अंगणवाडी इमारत होण्यापूर्वीचा लोखंडी पोल उभा असून त्या लोखंडी पोलमधून विद्युत प्रवाह अचानकपणे प्रवाहित होतो यामुळे या अंगणवाडी मधील लहान बालकांना, शाळेत बालक सोडणाऱ्या पालकांना धोका निर्माण झाला असून यापूर्वी याच लोखंडी पोलला येथील एका नागरिकाची म्हैस चारा खाण्यासाठी बांधली असता अचानक वीज प्रवाह प्रवाहित होऊन ती म्हैस तेथे लोखंडी पोलला चिकटल्याने ती दगावल्याची चर्चा आणि माहिती समोर येत आहे. यामुळे तो उभा असलेला धोकादायक लोखंडी पोल त्वरित काढून घेण्याची मागणी भादेकर नागरिक आणि पालकाकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments