जहागीरदार यांना राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
नळेगाव : येथील अल फारुख उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक वहाब नजीब जहागीरदार यांचा महाराष्ट्रा मीडिया व ऐकता सेवाभावी संस्थाच्या यांच्यातर्फे औरंगाबाद येथे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्रा मीडिया व ऐकता सेवाभावी संस्था परभणीच्या संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे दि १७ ऑगस्ट रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम बप्पा काळे साहेब हे होते. प्रमुख पहुणे म्हणून महाराष्ट्रा राज्य औकाफ महामंडळचे अध्यक्ष मा समीर काझी, अजमत खान पठाण, सरताजसिंग चहल, खय्यूम खान पठाण आदी उपस्तित होते. वहाब जागीरदार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मुजीब पटेल जागीरदार, नजीब जागीरदार, शुकुर जागीरदार, मदन धुमाळ कादिर जहागीरदार, नुसरत कादरी, मोईज काझी, प्रा दयानंद झमारे, मुजीब शेख, हाश्मी मोईनोद्दीन, ईशाद पिरजादे, हुसैन घोरवाडे, फय्याज सय्यद, महेबूब शेख आदीने अभिनंदन केले.


0 Comments