शिरोळ येथे गुरुजनांच्या सेवेचा कृतज्ञता सोहळा संपन्न
निटुर : निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथे माजी विद्यार्थ्यांतर्फे गुरुजनांच्या सेवेचा सत्कार सोहळा संस्कार वर्धिनी हायस्कूल येथे संपन्न झाला. या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा सत्कार सोहळा पार पडला. निमित्त होते ते दोन गुरुजनांच्या सेवापूर्तीचे.
हाश्मी आणि डी डी जाधव हे दोघेही या महिन्यात सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने शिक्षकांचे आपणही काही देणे लागतो ही जाण ठेवून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमेल तशी जमा करून एक अप्रतिम असा गुरुजनांच्या सेवेचा सत्कार सोहळा संपन्न केला. शिरोळ येथे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या सर्व माजी शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला संबोधित करत असताना राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. ओम प्रकाश जाधव यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षणासाठी मी स्वतः त्यांच्या शिक्षणाचा खर्च करीन पण विद्यार्थ्यांनी शिकलोच पाहिजे असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात माझ्याकडून शैक्षणिक मदत जी करता येतील ते मी करायला तयार आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.ओमप्रकाश जाधव, निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प लातूर चे सतीश नरहरे व शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे, निटुर पोलीस चौकीचे सुधीर शिंदे, संदीप तिपराळे हे उपस्थित होते.



0 Comments