Latest News

6/recent/ticker-posts

अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गिकरणाचा निर्णय मागे घ्यावा

अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षण उपवर्गिकरणाचा निर्णय मागे घ्यावा


सतीश तांदळे

लातूर : सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या अनुसूचित जाती आणि जमाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध करीत हा निर्णय त्वरित मागे घ्यावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना करण्यात आले आहे.

लातूर येथील माता भिमाई सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्याकडे संस्थेच्या पदाधिकारी यांनी निवेदन सादर केले. आरक्षण उपवर्गिकरणाचा निर्णय संविधान विरोधी असून घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शाहूंराज कांबळे, रोहिदास सोनकांबळे, शिवाजी कांबळे, सुधाकर कांबळे, अशोक कांबळे, नरसिंग गायकवाड, दत्तात्रय कांबळे, अंगद कांबळे, बाबुराव कांबळे, शंकर कांबळे, राजेंद्र शेळके यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments