Latest News

6/recent/ticker-posts

चिखली-पुणे येथे ब्लॅक बेल्ट विविध डॅन ग्रेडिंगचे कराटेपटूंना प्रमाणपत्र प्रदान

चिखली-पुणे येथे ब्लॅक बेल्ट विविध डॅन ग्रेडिंगचे कराटेपटूंना प्रमाणपत्र प्रदान


 

पुणे: { प्रतिनिधी/मुस्तफा सय्यदसंतपीठ हायस्कूल, पाटीलनगर, टाळगाव, चिखली देहु-आळंदी रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे Dan ग्रेडिंग प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात अनेक प्रशिक्षकासह विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती साऊथ आफ्रिका(देश) राजधानी केपटाऊ चे आंतरराष्ट्रीय अशिहरा कराटेचे संस्थापक अध्यक्ष केईचो हुसेन नारकर, जगद्‌गुरू श्रीसंत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर घाडगे. उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशनचे प्रमुख सी. ए. तांबोळी हे होते.

Dan ग्रेडिंग, जो कराटेमधील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगत स्तर मानला जातो, यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये लातूर जिल्ह्यातील दोन प्रशिक्षकांचा आहे समावेश होता. सोहळ्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी.ए. तांबोळी यांनी कराटेचे तत्त्वज्ञान आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व विषद केले. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे Dan ग्रेडिंग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांवर कठोर मेहनत घेऊन हे यश संपादन केले होते. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरला आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. कराटे बेल्ट प्रमाणपत्र वितरण हा एक महत्त्वाचा सोहळा असतो ज्यामध्ये कराटे शिकणाऱ्यांना त्यांच्या प्रगतीनुसार विविध बेल्ट आणि प्रमाणपत्र प्रदान केले जातात. प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षकांकडून त्यांच्या कठोर मेहनतीचे आणि प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र घेतात. हा सोहळा प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक करण्यासाठी आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कराटे प्रशिक्षण आत्माराम घोगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक गोरखनाथ मोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments