Latest News

6/recent/ticker-posts

वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

औराद शहाजनी: संस्कृती प्रतिष्ठान संचलित वसंतराव पाटील विद्यानिकेतन शाळेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले मुळे सिद्रामप्पा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी कैफ, संस्कृती, अरूंधती, ऋतुजा, भक्ती, प्रियाणी, स्वरांजली, अग्निवेश, जोया या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. बिरादार वेदांत या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे भाषण केले. त्याच्या उत्कृष्ट भाषणामुळे शिंदे शिवाजी(माझी केंद्रप्रमुख),  शिंदे हर्षवर्धन शासकीय(अभियंता) हिंगोली यांनी रोख बक्षिस देऊन वेदांतचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल बिराजदार यांनी केले. आभार प्रा. दत्ता माने यांनी मानले याप्रसंगी शिंदे शिवाजी, शिंदे हर्षवर्धन ,सगरे ईश्वर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments