Latest News

6/recent/ticker-posts

तीन सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार),पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई

तीन सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार),पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई

लातूर: पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे  राहुल चंद्रकांत वाघमारे, वय 31 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी, लातूर., आकाश भगवान काळे, वय 28 वर्ष, राहणार काळे गल्ली, लातूर., रणजीत दयानंद कांबळे,वय 28 वर्ष, राहणार महाराणा प्रताप नगर,बाभळगाव रोड, लातूर. असे असून नमूद आरोपींतावर सन 2014 ते 2024 कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळी तयार करून समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील व्यावसायिक व रहिवासी लोकांच्या मालमत्तेला इजा पोहोचून भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून जबरीचोरी, चोरी करणे, रात्री अपरात्री रस्त्यावरील वाहने अडवून लुटणे, आजन्म कारावास किंवा अन्य करावासाचे शिक्षेस प्राप्त असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.

जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी. याकरिता नमूद सराईत गुन्हेगारां कडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता करणाऱ्या गुन्हेगाराना 01 वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले असून नमूद गुन्हेगारांना लवकरच लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात येणार आहे. नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर सोहेल शेख, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरविंद पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले ,पोलीस अमलदार प्रदीप स्वामी यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पाठवले होते. त्यावर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद आरोपी मुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने व आगामी काळात होणारे निवडणुका व सण-उत्सव अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55  प्रमाणे कार्यवाही करून  सदर सराईत गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात केले आहे. सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार,उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला आहे.

Post a Comment

0 Comments