Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास नूतन तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट;कामाबाबत व्यक्त केले समाधान

भादा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास नूतन तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट;कामाबाबत व्यक्त केले समाधान


बी.डी.उबाळे 

औसा: नूतन तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले डॉ रेवणनाथ देवणीकर यांनी भादा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरास (प्राथमिक आरोग्य केंद्र भादा) शनिवार दिनांक 21सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 02 वाजता भेट देऊन येथील वैद्यकीय उपचार, सेवा साधणे,आवश्यक कर्मचारी आदींची माहिती घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन केले आणि तेथील वातावरण आणि परस्थिथीचा अभ्यास करून चालू आहे ते काम समाधानकारक आहे.असं त्यांनी त्यांच्या आगमनानिमित केलेल्या स्वागत पर सत्कार प्रसंगी उत्तर देताना आपले मनोगत वजा मत व्यक्त केले.

तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पवार, औषध निर्माण अधिकारी श्रीमती वैशाली नाबदे,आरोग्य कर्मचारी त्यांचे व इतर सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचे काम अतिशय चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले की, आता नवीन वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ संतोष पाटील हे सुद्धा तुमच्या आरोग्य केंद्राला एक उत्कृष्ट डॉक्टर मिळाले आहेत त्यांचा फायदा या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नक्कीच होईल. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त करून त्यांनी सर्व कर्मचारी यांच्याशी आरोग्य केंद्रातील सुविधा बाबत चर्चा केली. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. महेश पवार, आरोग्य सेवक कांबळे, लिपीक धनराज जोगदंड, रुग्णवाहिका चालक सोमनाथ बनसोडे, सर्जे, भोरे, बळीराम रसाळ आणि भादा आरोग्य केंद्रातील, सर्व उपकेंद्रातील कर्माचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments