पुण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 चे पोस्टर विमोचन
पुणे : नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या पोस्टरचे विमोचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयात पार पडले. हा सोहळा दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित(दादा) पवार यांच्या शुभहस्ते झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश(आण्णा) घुले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अजितदादा पवार यांनी आयोजक मंडळाचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास सहकार्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रीय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, पुणे येथे 20 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील खेळाडू सहभागी होणार असून, महाराष्ट्राच्या किकबॉक्सिंग क्षेत्राला यामुळे नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या प्रसंगी सी. ए. तांबोळी - अध्यक्ष : महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन, बापूसाहेब घुले - अध्यक्ष : नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशन N.G. (WAKO India), नितीन मुळे, पल्लवी किरवे, श्रद्धा शिंगारे नवले, प्रियांका बडेकर, ओंकार किरवे, नदीम तांबोळी, अतुल घुले, मोहम्मद अली तांबोळी यांचा समावेश होता.


0 Comments