Latest News

6/recent/ticker-posts

धाराशिवची सई साप्ते राज्यस्तरीय ज्युदो सुवर्णपदक विजेती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

धाराशिवची सई साप्ते राज्यस्तरीय ज्युदो सुवर्णपदक विजेती; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे : (प्रतिनिधी /अश्फाक तांबोळी) श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, पुणे आणि महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत धाराशिव येथील कुमारी सई गणेश साप्ते हिने १४ वर्षाखालील वयोगटातील ३२ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल धाराशिव जिल्हा तसेच लातूर विभागातून तिचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, सई साप्तेची निवड राजस्थान येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय ज्युदो क्रीडा स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विभागातील उदयोन्मुख खेळाडूंना नवी प्रेरणा मिळेल, असे मत क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. या स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभात जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या वेळी डी. एन. तलवाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments