Latest News

6/recent/ticker-posts

मानद डॉक्टरेट पदवीने ‘माझं लातूर’ परिवाराचे उमेश कांबळे सन्मानित

मानद डॉक्टरेट पदवीने ‘माझं लातूर’ परिवाराचे उमेश कांबळे सन्मानित


लातूर : माझं लातूर परिवारातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव आणखी एक पायरी गाठला आहे. या परिवारातील सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश अंबादास कांबळे यांना सामाजिक क्षेत्रातील सेवेसाठी मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. इंदोरमधील माँ भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थान या संस्थेने कांबळे यांच्या समाजहितार्थ केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची प्रतिष्ठित मानद डॉक्टरेट पदवीसाठी निवड केली. काल इंदोर येथे झालेल्या संस्थानच्या महामेळाव्यात कांबळे यांना या सन्मानाने गौरविण्यात आले.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माझं लातूर परिवाराच्या वतीने उमेश कांबळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments