Latest News

6/recent/ticker-posts

शालेय राज्यस्तरीय कराटेसाठी इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या दोन खेळाडूंची निवड

शालेय राज्यस्तरीय कराटेसाठी इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या दोन खेळाडूंची निवड

लातूर : दि. 11 नोव्हेंबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये लातूर शहरातील इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी दोन खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. वर्ष 17, 64 कि. खालील गट: प्रगती उद्धव जाधव, वर्ष 14, 30 कि. खालील गट: हर्ष मनराज आकडे

तसेच, उत्कृष्ट प्रदर्शन करत अत्यंत चुरशीच्या सामन्यात अल्प फरकाने पराभूत होत द्वितीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थीनी वर्ष 14, 50 कि. खालील गट: वैष्णवी विजय जाधवया सर्व खेळाडूंना इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनचे अध्यक्ष शिहान आजमीर शेख तसेच प्रशिक्षक रवीकुमार शिंदे, विश्रांत कांबळे, मुजाहिद सय्यद आणि रेहान शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments