Latest News

6/recent/ticker-posts

पुण्यात राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा; राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे देशभरातील 500 हुन अधिक स्पर्धकांचा सहभाग

पुण्यात राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा; राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे देशभरातील 500 हुन अधिक स्पर्धकांचा सहभाग

पुणे : शहरातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये 20 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचा भव्य शुभारंभ झाला. देशभरातील 500 हून अधिक स्पर्धक, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला असून त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा, केरळ, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि महाराष्ट्र या राज्यांच्या संघांचा उल्लेखनीय सहभाग नोंदवला गेला आहे.

स्पर्धेचे उद्घाटन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी सरपंच शिवराज आप्पा घुले, पुरुषोत्तम धारवाडकर, सुमित आप्पा घुले, महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब घुले, संयोजक अध्यक्ष अतुल घुले आणि संयोजक सचिव नितीन मुळे उपस्थित होते. 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:00 वाजता आयोजित रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. या सोहळ्याला खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, उद्घाटनानंतर विविध वयोगटातील स्पर्धांना उत्साहपूर्ण प्रारंभ झाला असून खेळाडूंच्या दमदार कामगिरीने वातावरण क्रीडामय झाले आहे.

Post a Comment

0 Comments