जि.प. सेस निधी अंतर्गत 546 लाभार्थ्यांची निवड
लातूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत, 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जि.प. सेस 20 टक्के मागासवर्गीय निधी अंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजना पद्दतीने पात्र लाभार्थ्यांची निवड दिनांक 3 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी सभागृहात व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पार पडली. निवड प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या योजनांअंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना मिरची कांडप यंत्र, मिनी पिठाची गिरणी, पिको फॉल यंत्र तसेच लघुउद्योगासाठी शेळीपालन व 5 एचपी पाणबुडी पंप पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्यातून एकूण 3,617 अर्ज आले असून, त्यातून सोडत पद्धतीने 546 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागातील अधिक्षक आणि कर्मचारी यांनी या यशस्वी निवड प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले आहे.


0 Comments