सोनखेड ग्रामस्थांची जिल्हा परिषद शाळेला भेट
सोनखेड : (प्रतिनिधी/चांदसाब मुल्ला) ता. निलंगा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत शैक्षणिक व्यवस्थेची पाहणी केली. या भेटीचा उद्देश शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांच्या कार्यपद्धतीची माहिती घेणे हा होता. भेटीदरम्यान ग्रामस्थांनी शाळेतील अध्यापन पद्धती, उपस्थिती, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि एकूणच शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेतील शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांची प्रगती याबद्दल माहिती दिली.
अध्यक्ष भागवत गोपाळ धुमाळ यांनी शाळेच्या दैनंदिन व्यवस्थेची सविस्तर चौकशी करत शिक्षक व शिक्षणसेवकांशी संवाद साधला. त्यांनी शाळेसमोरील सध्याच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक शैक्षणिक साहित्य, सुविधा व सुधारणांबाबत ग्रामपातळीवरील सहकार्याचे आश्वासन दिले.
0 Comments