Latest News

6/recent/ticker-posts

लहानग्या पालखीचा वाढदिवस ठरला विद्यार्थ्यांचा आनंदसोहळा

लहानग्या पालखीचा वाढदिवस ठरला विद्यार्थ्यांचा आनंदसोहळा

शिरूर अनंतपाळ : नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या सुकन्या कु. पालखी लखनगावे हिचा द्वितीय वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसावरचा अनावश्यक खर्च टाळून शहरातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करून हा सोहळा उत्साहात साजरा झाला. या उपक्रमात जि.प. केंद्रिय शाळा, जि.प. प्राथमिक मुलींची शाळा, जि.प. प्राथमिक शाळा भोजराजनगर, जि.प. प्राथमिक शाळा समतानगर आणि जि.प. प्राथमिक शाळा नागेवाडी या पाच शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र देवशटवार, नगरसेवक सुधीर लखनगावे, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, नागनाथ उंबरगे, संकेत बनकर, नगरसेवक ऋषिकेश आवाळे, नगरसेवक माधव खरटमोल, मुख्याध्यापक परमेश्वर तोंडारे, सोमनाथ घटकार, राजकुमार पाटील, मारोती शिवणे, संजय डिगोळे यांसह शाळेतील शिक्षक, शा.व्य. समितीचे सदस्य, लखनगावे परिवार, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे भान विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य झाले असून उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments