लातूरच्या रेसलिंगपटूंचे गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत शानदार यश
बोरोळच्या युवा खेळाडूंनी मिळवली १० पदके; सोहेल पठाणचा तिहेरी यश
लातूर : ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पँक्रेशन फेडरेशन (AITWPF) च्या १३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील बोरोळ (ता. देवणी) येथील युवा रेसलिंगपटूंनी चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा गौरव वाढवला. दिनांक ७ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान गोवा येथील बॅडमिंटन हॉल, पेड्डेम, मापुसा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत लातूरच्या पाच खेळाडूंनी मास रेसलिंग, बेल्ट रेसलिंग आणि नागा रेसलिंग या तीन प्रकारांत एकूण १० पदके जिंकली.
सोहेल शरीफ पठाण (वरिष्ठ पुरुष, अंडर-५५ किलो): मास रेसलिंग - सुवर्णपदक, बेल्ट रेसलिंग - कास्यपदक, नागा रेसलिंग - कास्यपदक., शुभम माधुकर बालुरे (वरिष्ठ पुरुष, अंडर-६० किलो): बेल्ट रेसलिंग - कास्यपदक., अजय संजय सूर्यवंशी (अंडर-१७ मुलं, ५० किलो): बेल्ट रेसलिंग - रजतपदक., ईश्वर वैजनाथ मोतीरावे (अंडर-१७ मुलं, ५५ किलो): बेल्ट रेसलिंग - कास्यपदक, नागा रेसलिंग - कास्यपदक. कन्हैया रामराव सूर्यवंशी (अंडर-१७ मुलं, ६५ किलो): मास रेसलिंग - रजतपदक, बेल्ट रेसलिंग - कास्यपदक, नागा रेसलिंग - कास्यपदक.
या यशस्वी खेळाडूंना विश्वजीत येनकुरे यांचे मार्गदर्शन लाभले. रुरल अँड अर्बन ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन, लातूरचे सचिव के. वाय. पटवेकर, रमेश मनसुरे, मनोज कन्नाडे, गजानन भोपणीकर, देवणी, प्रा.डॉ.अनिल इंगोले, प्रताप कोयले, विक्रम गायकवाड, शुभम बोडके अदीने खेळाडूंचे अभिनंदन करून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.



0 Comments