Latest News

6/recent/ticker-posts

पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतीक्षा जाधवांना सुवर्ण

 पॉवरलिफ्टिंगमध्ये प्रतीक्षा जाधवांना सुवर्ण


सोलापूर : रॉ पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने आयोजित जागतिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सोलापूरची प्रतीक्षा सुधाकर जाधव हिने उज्वल कामगिरी केली. ७२ किलो वजनी गटात सहभागी होऊन तिने सुवर्णपदक पटकावले असून, देश आणि सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.

अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत प्रतीक्षाने आपल्या शक्तीचे आणि कौशल्याचे कमाल प्रदर्शन करत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. तिचे प्रशिक्षक तौफिक इनामदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सोलापूरमधील एनएफसी जिम येथे तिने या स्पर्धेसाठी कठोर सराव केला होता. प्रतीक्षाच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना तिच्या यशाने मोठी प्रेरणा मिळाली असून, सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments