लातूर जिल्हयातील दोघांना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
अंकुश कांबळे,बालाजी पवार यांना राज्य शासनाचा पुरस्कार
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी दिल्या जाणा-या पुरस्कारासाठी लातूर जिल्हयातून दोघांची निवड झाली असुन सामाजिक कार्यकर्ता म्हणून लातूर येथील अंकुश विश्वनाथ कांबळे यांची तर लोक कलावंत म्हणून उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथील बालाजी धोंडीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे.
संकल्प व्यसनमुक्त महाराष्ट्राचा, सन्मान सेवेचा या टॅग लाईन खाली राज्य शासनाच्या वतीने ०५ वर्षाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असुन यात राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जिल्हयातील दोघांना जाहीर झाले आहे. सदर पुरस्काराचे वितरण दि.२५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह नरिमन पॉईट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, मुंबईच्या महापौर रितु तावडे व लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ०५ वर्षातील पुरस्काराचे वितरण यात होणार असुन लातूर जिल्हयातील या दोघांना सन २०२३-२४ चा हा पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्काराबद्दल दोघांचे कौतुक जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांनी केले असुन जिल्हा परिषदेतील समाज कल्याण कार्यालयात अंकुश कांबळे व बालाजी पवार यांचा सत्कार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यालयीन अधिक्षक मोहन चव्हाण, सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी शिरडे, समाज कल्याण निरीक्षक राहूल काळे, विक्रम जाधव, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, व्यंकट लामजाने, प्रशांत चामे, राजकुमार पवार, राजकुमार बेंबडे, श्रीकांत उंबरे यांची उपस्थिती होती.



0 Comments