निटूर : जामा मस्जिदेत ईद मिलनाने भाईचार्याला बळकटी
निटूर : बाजार चौकातील जामा मस्जिदेत मजीत कमिटीच्या वतीने शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाने हिंदू-मुस्लिम भाईचार्याला अधिक दृढ केले असून, उपस्थित समाजबांधवांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाला नूतन निटूर पंचायत समिती सदस्य अनिल पाटील, माजी सरपंच परमेश्वर हासबे, उपसरपंच शिवराज सोमवंशी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दिनकर निटुरे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मुन्ना जमादार, स्टेट बँक ऑफ इंडिया निटूर शाखेचे मॅनेजर बालाजी बावलगे उपस्थित होते. इस्लामिक हिंद लातूर शाखेचे जिल्हा संघटक इकराम शेख प्रमुख वक्ते म्हणून मंचावर होते. त्यांनी रमजान ईद व रोजा ईद मिलनाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक विचार मांडले.
नूतन पंचायत समिती सदस्य अनिल पाटील यांनी ईद मिलन पायंडा पाडल्याबद्दल मस्जिद कमिटीचे आभार मानले. माजी सरपंच परमेश्वर हासबे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, भाईचारा, सौहार्द, विश्वास आणि बंधुत्वाची नाळ ईद मिलनानिमित्त अधिक घट्ट झाल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. हाडगेकर, डॉ. सेंदकर, जब्बार चाऊस, मल्लिनाथ बुरकुले, राजकुमार जमादार, लतीफ चाऊस, महेश तापडिया, अभय सोमवंशी, पत्रकार राजकुमार सोनी, जावेद मुजावर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद गस्ते, शब्बीर शेख, बाबू सरदार, गणीभाई शेख, महेबूब शेख, बिलाल शेख, हशम माडीवाले, मिनाज गस्ते, हाफिज आयाज, इरफान शेख, अजहर गस्ते, रफिक मुल्ला, इसाक गस्ते, जिलानी शेख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रसूल सरदार यांनी केले, तर हाफिज इब्राहिम पटेल यांनी आभार मानले.




0 Comments