Latest News

6/recent/ticker-posts

मुलींच्या सुरक्षेसाठी पीएम श्री गौर शाळेचा 'मार्शल आर्ट्स' उपक्रम

मुलींच्या सुरक्षेसाठी पीएम श्री गौर शाळेचा 'मार्शल आर्ट्स' उपक्रम


भविष्यातली खेळाडू घडणार - मुख्याध्यापक भंडारी

गौर : (प्रतिनिधी/निलेश तावडे) विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळांमधील मुलींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मोठी गरज आहे. यामुळे मुली मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबी बनू शकतात. अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित वातावरणात व्यावहारिक स्व-संरक्षणतंत्र शिकवली जातील, तर मुलींची सुरक्षितता निश्चित होईल.

या अनुषंगाने पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गौर (ता. निलंगा) येथे मुलींना स्व-संरक्षणाचे नियमित प्रशिक्षण सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षक के. वाय. पटवेकर (इंटरनॅशनल अशिहरा कराटे ब्लॅक बेल्ट, ४ डॅन) यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित वेळेत व्यवस्थितपणे चालू आहे. प्रशिक्षक पटवेकर म्हणाले, "हे प्रशिक्षण केवळ स्व-संरक्षणासाठीच नव्हे, तर मुलींना शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्यास शिकवते. नियमित सरावाने त्या भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात".

यामुळे शाळेतील मुलींमध्ये स्वावलंबी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडत आहे. शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भंडारी, सहशिक्षक व्ही. एम. क्षीरसागर, बी. जी. सोमवंशी, पी. एस. सूर्यवंशी, डी. आर. कांबळे, एस. जी. सोदले, सुवर्णा कांबळे, प्रेमला सुरवसे आणि शुभांगी गोडगे यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण सुरू आहे. यामुळे शाळेचे स्थान उंचावेल आणि भविष्यात मार्शल आर्ट्स खेळात उत्तम खेळाडू घडतील, अशी खात्री मुख्याध्यापक भंडारी यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments