महापौरांच्या हस्ते गोलाईत उभारली सार्वजनिक गुढी
महापौर जयश्री सोनकांबळे, पोलिस अधिक्षक अमोल तांबे, जि.प. सीईओ राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त सौ.मानसी मीना यांच्या हस्ते मानाच्या गुढीचे पूजन
विविध सामाजीक उपक्रमांचा संकल्प, स्वच्छता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती संदेश
लातूर : गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासमोर गुढी पाडव्याच्या दिवशी गुरुवार १९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता परंपरेप्रमाणे "प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढी"चे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून गोलाई भोवती गुढीची मिरवणूक काढत मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. येत्या वर्षभरासाठी विविध सामाजीक उपक्रमांचा संकल्प करत प्लॅस्टीकमुक्ती सोबत वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान आणि पाणी बचतीबाबत जनजागृती संदेश देण्यात आला. तसेच झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला.
प्रारंभी लातूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, पोलिस अधिक्षक अमोल तांबे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, मनपा आयुक्त सौ. मानसी मीना, मनपा क्षेत्रीय अधिकारी समाधान सुर्यवंशी, गंजगोलाईचे नगरसेवक गिरीश ब्याळे, गणेश गवारे, सौ. मंजूलता अग्रवाल, यांच्या हस्ते प्रथम मानाच्या सार्वजनिक गुढीचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल, यंदाच्या महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे, स्वागताध्यक्ष अमोल गिते, अप्पू भरडे, बालाजी गवळी, विष्णू भुतडा, नितिन पडिले, रामभाऊ जवळगे, नवनाथ भोसले, बालाजी पारसेवार, नारायण भूतडा, सौ सुस्मिता सगरे, विद्याताई काळे, दीपक काळे, प्रभाकर चव्हाण, वामन पाठक, रवि जाधव, संदीप येरावार, सचिन गांगले, पवन जवळगे आदिंनी केले.
तत्पूर्वी सार्वजनिक गुढी महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांच्या प्रमूख उपस्थितीत गतवर्षीचे अध्यक्ष रामभाऊ जवळगे आणि गतवर्षीचे स्वागताध्यक्ष नवनाथ भोसले यांच्या हस्ते यंदाचे महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे आणि स्वागताध्यक्ष अमोल गिते यांच्याकडे यंदाच्या गुढी महोत्सवासाठीचा पदभार सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर परंपरेप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते गुढीचे पूजन करून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गंजगोलाई भोवती जंगी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकी नंतर मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तीचा प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांची यथोचित भाषणे झाली. प्रस्ताविक पतंजलीचे प्रमूख योगशिक्षक विष्णू भूतडा यांनी केले. मनोगत संस्थापक अध्यक्ष पंकज जैस्वाल यांनी केले. गुढी महोत्सवाचे अध्यक्ष विकास कांबळे यांनी वर्षभरातील विविध संकल्प सांगितले. तर स्वागताध्यक्ष अमोल गिते यांनी वृक्ष चळवळीचे महत्व सांगीतले. सुत्र संचलन सारीका डांगे व दयानंद कलशेट्टी यांनी केले. शेवटी आभार प्रभाकर चव्हाण यांनी मानले. डॉ. भास्करराव रामराव पाटील, शरद केशवराव झरे, आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन, महावितरणचे राहूल गाडे, आर टू आर फाउंडेशनचे राहूल पाटील, माझ लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य महेबूब उर्फ बाबा शेख, आरोग्यदूत उद्धव तेलंगे, सर्पमित्र भिमाशंकर गाढवे, योगशिक्षक प्राचार्या सुस्मिता सगरे, प्राचार्या विद्या काळे, डी.व्ही. काळे, डॉ. विजय अजनीकर, सर्फराज सय्यद, अँड. आर बी लोंढे, उद्योजक शिरीष जैन व आशिष जैन, डॉ. बी. सी. घाटे, गोर्विद राजे, संतोष धाराशिवकर, पत्रकार विनोद कांबळे, लिंबराज पन्हाळकर, सचिन अंकुलगे, रामभाऊ जवळगे, धनराज माने, रशीद तांबोळी, दिनेश कबाडे आदीना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सार्वजनिक गुढी पाडवा महोत्सवाच्या अनुषंगाने पर्यावरण पूरक उपक्रमांचे संदेश देण्यात आले. स्वच्छता संदेश, पाणी बचतीचे महत्व, वृक्ष संवर्धनाचा संदेश, वाहतूक नियमाचे पालन, शिस्तीचे महत्व या बाबत पत्रक वितरीत करून पर्यावरणपूरक जनजागृती करण्यात आली. प्रारंभी जगदंबा मंदिरातील देवीची अभिषेक पूजा विश्वस्त शिवशंकर पारशेट्टी दाम्पत्य, काळे दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी नारायण भूतडा, किशोर जैन, प्रभाकर शिरूरे, काकासाहेब घुटे, प्रकाश शिदे, दिनेश कबाडे, प्रभाकर चहाण, रवि बिलगुंदे आदिंचिही उपस्थिती होती.




0 Comments