दिव्यांगांच्या मेंदुविकारावर मोफत तपासणी शिबीर
लातूर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर राहुल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून मेंदुविकार असणाऱ्या बालकांना मोफत तपासणी व औषधे वाटप करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून २०२५-२६ या वर्षात राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव येथे ५ एप्रिल २०२६ रोजी (रविवारी) शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात मेंदुविकार तज्ज्ञांमार्फत लाभार्थ्यांची तपासणी, उपचार व मोफत औषध वाटप होणार आहे.
अहमदपूर, उदगीर व चाकूर परिसरातील मेंदुविकार असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणे सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments