केळगाव आश्रम शाळेतील मुख्याध्यापक डी. बी. पासमे यांची सेवानिवृत्ती
निलंगा : तालुक्यातील केळगाव येथील शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक दिनकर बाबुराव पासमे यांची सोमवारी ३६ वर्षे ९ महिन्यांची सेवानिवृत्ती साजरी करण्यासाठी गौरव व ऋणमुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाची अध्यक्षता एकलव्य मागास सेवा समिती, मानखेड संस्थेचे सचिव सचिन भिकाने व सहसचिव डॉ. शशिकिरण भिकाने यांनी केली. विशेष अतिथी म्हणून सहाय्यक संचालक (इ.मा.वि.क. वि.), लातूर जिल्हा अभय अटकळ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डायट लातूरचे प्राचार्य डॉ. मारुती सलगर, आश्रम शाळा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे, कोषाध्यक्ष संजीवनी विचापोली डॉ. राम दुडिले, फिनिक्स हॉस्पिटल लातूरचे डॉ. अमोल शेकडे, सहाय्यक वनसंरक्षक (लातूर-धाराशिव) डॉ. राहुल शेळके उपस्थित होते. ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
प्रथम गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नंतर डी. बी. पासमे सरांचा सपत्नीक सेवानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. अतिशय भावनिक व आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी भावनिकपणे पासमे यांनी निरोप स्वीकारून सर्वांचे आभार व्यक्त केले.



0 Comments