Latest News

6/recent/ticker-posts

गौर पीएम श्री शाळेत सातवी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा

गौर पीएम श्री शाळेत सातवी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा

'शिक्षक होणे सोपे नाही' - विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया; शिक्षकांचे कौतुक

गौर :( प्रतिनिधी/ निलेश तावडे )दि. २० : पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौर येथे आज (२० मार्च २०२६) इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात मुख्याध्यापक म्हणून कुमारी प्रतीक्षा गोविंद कांबळे तर उपमुख्याध्यापक म्हणून चिरंजीव प्रणव अनंत घारोळे यांनी जबाबदारी पार पाडली. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गांचे अध्यापन अनन्या दिगंबर सावंत, प्रतीक्षा गोविंद कांबळे, सई संतोष घारोळे, श्वेता धनंजय घारुळे, देवकन्या देशमुख, स्नेहा चंद्रकांत देशमुख, आदिती गोविंद गारुळे, आरती लक्ष्मण तावडे, प्रणव अनंत घारोळे, ऋग्वेद महादेव काळे व समर्थ दत्ता कारीकंटे या सातवीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे केले.

"शिक्षक होणे वाटते तेवढे सोपे नाही," अशी प्रतिक्रिया इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी आभार प्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भंडारी, सहशिक्षक व्ही. एम. क्षीरसागर, बी. जी. सोमवंशी, डी. आर. कांबळे, एस. जी. सोदले, सुवर्णा कांबळे, प्रेमला सुरवसे व शुभांगी गोडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व समजले, असे सांगितले जाते.

Post a Comment

0 Comments