जि.प.च्या सेस फंडातून दोन बालकांवर यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया
लातूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत कर्णबधिर व दिव्यांग व्यक्तींसाठी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शनिवारी लातूरच्या गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये दोन बालकांवर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्या संकल्पनेतून ५% दिव्यांग कल्याण निधीतून (सेस फंड) २०२५-२६ साठी आर्थिक तरतूद करण्यात आली. महागडी ही शस्त्रक्रिया आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना परवडणारी नसते. त्यामुळे जि.प.मार्फत सहाय्य दिले जाते.
सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. आनंद गोरे व डॉ. सुधीर कदम यांनी ही शस्त्रक्रिया केली. यासाठी जि.प.च्या नूतन अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, डॉ. हर्षदा गोरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, आर.बी.एस.के. जिल्हा समन्वयक अमोल झेंडे, डॉ. रफी गातेगावकर, डॉ. शितल चव्हाण, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अॅड. बसवेश्वर पसारे, शिरीषकुमार शेरखाने यांनी पुढाकार घेतला.
लातूर तालुक्यातील कार्तिक ज्योतीराम शिंदे (मंन्मथ) व निलंगा तालुक्यातील सांगवी जेवरी येथील मंन्मथ जीवन पाटील या दोन बालकांना हा लाभ मिळाला. आता त्यांच्या कानावर आवाज पडणार आहे.




0 Comments