Latest News

6/recent/ticker-posts

मुलांच्या उन्हाळी सुट्टीत कराटे, बॉक्सिंगसह फिटनेस शिबिर; 2 ते 10 मे पर्यंत नोंदणी सुरू

मुलांच्या उन्हाळी सुट्टीत कराटे, बॉक्सिंगसह फिटनेस शिबिर; 2 ते 10 मे पर्यंत नोंदणी सुरू


मोहोळ : अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर आणि इंडियन मिक्स्ड मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी, मोहोळ यांच्या वतीने मुलांसाठी स्पोर्ट्स ट्रेनिंग समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. "चला, स्वतःला घडवूया, नवीन कौशल्ये शिकूया!" या घोषणेसह मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या या शिबिरात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. शिबिराची मुदत 2 मे ते 10 मे 2026 असून, वयोमर्यादा 5 ते 15 वर्षे आहे.

या शिबिरात कराटे, कुंग-फू, बॉक्सिंग, योगा व व्यायाम, सेल्फ डिफेन्स टेक्निक्स, लाठीकाठी/नॉन चाकू, फन गेम्स, स्टेज डेरिंग, फिटनेस आणि मैदानी खेळ यांसारखे विविध उपक्रम असतील. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना पदक प्रदान केले जाईल.

शिबिराचे ठिकाण शिक्षण मित्र डी. व्ही. गायकवाड प्राथमिक शाळा, मोहोळ असून, अधिक माहितीसाठी सुजाता आदलिंगे (माळी) यांच्याशी +91 9422667953 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments