Latest News

6/recent/ticker-posts

निटूरमध्ये BLO मॅपिंगसाठी एक महिन्यापासून प्रतीक्षा; मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया रखडली

निटूरमध्ये BLO मॅपिंगसाठी एक महिन्यापासून प्रतीक्षा; मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रिया रखडली

लातूर : दि. १३ एप्रिल २०२६ - वार्ड क्र. १२० (निटूर) येथील ग्रामस्थांना गेल्या एका महिन्यापासून BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) सर मॅपिंगसाठी उपलब्ध होत नाहीत. शासनाने राबवलेल्या मतदार यादी सखोल पुनरिक्षण मोहिमेचा भाग म्हणून संबंधित विभागाकडून मतदारांना सक्रिय सहभाग घेऊन यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक राहण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, BLO नियुक्ती न झाल्याने ही प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे.

ग्रामस्थांना केवळ उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत. तहसीलदार साहेबांशी व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे संपर्क साधला असून, तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्याशीही संवाद झाला. माजी आणि सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली असली तरी "नोटेड" संदेशानंतर तीन दिवस उलटले तरी BLO नेमणूक झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य, प्रतिनिधी आणि निटूर गणातून पंचायत समिती-जिल्हा परिषद लढवणाऱ्या उमेदवारांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. सामान्य ग्रामस्थांकडून BLO नेमणुकीसाठी पर्यायी व्यक्ती सुचवण्याची चर्चाही सुरू आहे.

ग्रामस्थ म्हणतात, "शासनाच्या मोहिमेत भाग घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण प्रशासनाचा हलगर्जीपणा आम्हाला त्रास देत आहे. नवीन जिल्हाधिकारी महोदय तात्काळ BLO नेमणूक करतील का?" या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष देऊन ग्रामस्थांच्या त्रासावर तोडगा काढावा असे वार्ड क्र. १२० (निटूर) येथील ग्रामस्थातून बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments