Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे सन्मानित

राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात लातूरचे पत्रकार संतोष सोनवणे सन्मानित

मुंबई : समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथील अशोक सावंत हॉलमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यात लातूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष सोनवणे यांना त्यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय, सातत्यपूर्ण व प्रभावी कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठित “विकासरत्न प्रेरणा पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन २०१७ पासून पत्रकारितेत सक्रिय असलेल्या सोनवणे यांनी समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवत जनजागृती केली असून, त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मोलाचा हातभार लागला आहे.

या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. बाळासाहेब तोरस्कर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. आपल्या भाषणात त्यांनी पत्रकारिता व समाजकार्य हे लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगत, समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सोहळ्यात कला, क्रीडा, साहित्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments