Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन

औसा तालुक्यात खरोसा येथे हृदयद्रावक घटना: आईने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन


लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथे अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्याप्त करणारी घटना घडली. २५ वर्षीय निकिता अमरदीप भूरे या महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


मृत मुलांचे नावे शिवानी आणि शिवांश अशी आहेत. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हे या टोकाच्या पावलाचे कारण असावे, असा अंदाज आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये शोकाची लहर उसळली आहे.

Post a Comment

0 Comments