Latest News

6/recent/ticker-posts

नर्गिस शेख यांच्या जिद्दीने यशस्वी झेप; युवकांसाठी प्रेरणादायी - नगरसेवक सुधीर लखनगावे

नर्गिस शेख यांच्या जिद्दीने यशस्वी झेप; युवकांसाठी प्रेरणादायी - नगरसेवक सुधीर लखनगावे


शिरूर अनंतपाळ : शहरातील प्रभाग १३ मधील रहिवासी बांधकाम व्यवसायिक ईमाम शेख यांची स्नुषा नर्गिस शेख यांनी जिद्द व अथक परिश्रमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सरळ सेवा भरतीत पहिल्याच प्रयत्नात धर्मादाय आयुक्तालय, मुंबई येथे निरीक्षक पद मिळवले. या यशाबद्दल नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या वतीने नर्गिस शेख यांच्या सपत्नीक कोटुंबाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.


या वेळी नगरसेवक सुधीर लखनगावे म्हणाले, "कोटुंबिक दैनंदिन कामे करताना यश मिळवणे अशक्य वाटले तरी दृढ निश्चय, जिद्द, कठोर परिश्रम, चिकाटी व योग्य नियोजनाने उपलब्ध संसाधनांचा वापर करून अभ्यासात सातत्य ठेवले तर यशाची शिखरे गाठता येतात. नर्गिस शेख यांचे हे यश सामान्य कुटुंबातील विद्यार्थी व महिलांसाठी प्रेरणादायी आहे." त्यांनी शुभेच्छा देताना युवकांना प्रोत्साहन दिले.

या सोहळ्याला काँग्रेस शहराध्यक्ष अशोक कोरे, मुख्याध्यापक माधव बेल्लेवाड, सोमनाथ तोंडारे, केंद्रिय मुख्याध्यापक सोमनाथ घटकार, व्यंकट हंद्राळे, व्यंकट दाहिगुंडे, वैभव बेल्लेवाड, दीपक घटकार, रमजान शेख, आसिफ उजेडे, प्रभाकर धुमाळे, ईमाम शेख यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ घटकार यांनी केले तर आभार सोमनाथ तोंडारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments