१००% निकालाने क्राईस्टची ११ वर्षांची परंपरा कायम; जान्हवीचा ९६.६०% टॉप स्कोअर
अहमदपूर : शाळेची गुणवत्ता पुन्हा सिद्ध करत सलग ११ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल यावर्षीही १०० टक्के लागला असून, जान्हवी कदम हिने ९६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. आदिती कटकमवार हिने ९४.२० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. ९१.२० टक्के गुणांसह अथर्व कदम तृतीय तर ९०.२० टक्के गुणांसह संस्कृती महाजन चतुर्थ स्थानावर आहे.
या परीक्षेसाठी शाळेतून ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यसह, ६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या यशाबद्दल दि.एन.टी.सी.सी. सोसायटी व जे.एम.ई. सोसायटीचे अध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू जीवनकुमार मद्देवाड-माले, शाळा संचालक दादासाहेब गायकवाड, प्राचार्या जेबाबेरला नादार, भारत स्काऊट्स अँड गाईड्स जिल्हा संघटक शंकर चामे, PTA उपाध्यक्ष रोहिदास कदम, जॉईंट सेक्रेटरी मिलिंद दाभाडे, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, सुपरवायजर गोविंद वलसे, मार्केटिंग हेड भाऊसाहेब यादव, PTA सदस्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.



0 Comments