Latest News

6/recent/ticker-posts

लातूरमध्ये तायक्वांदो विशेष प्रशिक्षण वर्ग; पत्रकार पाल्यांना मोफत

लातूरमध्ये तायक्वांदो विशेष प्रशिक्षण वर्ग; पत्रकार पाल्यांना मोफत


लातूर : शालेय परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीत मुलांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला वाव मिळावा, यासाठी शहरात तायक्वांदो प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणासोबत शासकीय सवलतींचाही लाभ मिळेल. तायक्वांदो केवळ क्रीडा नसून, मुलांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, स्वयंशिस्त आणि कणखरपणा निर्माण करते. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे आणि अभ्यासात एकाग्रता वाढवणे यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. टीव्ही-मोबाईलच्या आभासी जगातून मुलांना मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी हा उत्तम उपक्रम आहे.

शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण. इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेत ५ ते २५ अनुक्रमे अतिरिक्त गुण. ३० एप्रिलपर्यंत प्रवेशावर २ युनिफॉर्म मोफत जिल्हा क्रीडा संकुल (बहुउद्देशीय इमारत), औसा रोड: सायंकाळी ६ ते ७.३०. पत्रकार व संपादकांच्या पाल्यांना हा उपक्रम मोफत असेल. अधिक माहितीसाठी आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments