Latest News

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची:राष्ट्राला"संविधान" रूपी शिदोरी...

प्रासंगिक लेख .. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती -14 एप्रिल 2026

राजेंद्र नामदेव सूर्यवंशी यांच्या लेखणीतून...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची:राष्ट्राला"संविधान" रूपी  शिदोरी...


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला संविधान रुपी दिलेले शिदोरी सर्वधर्मसमभाव सामाजिक सलोखा कायदा धोरण अर्थनेते या बाबीचा सांगोपांग विचार करता सर्व समावेशक अशी विचारधारा देणारा महान महाकारुणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 75 वर्षापुर्वी दिलेला विचार सामाजिक दृष्ट्या आणि सर्व समाजाला सोबत घेऊन विकासाची कामे जलद गतीने करण्याचा मानस मांडणारा महापुरुष संपूर्ण जगतात एकमेव असा विश्वरत्न म्हणवला गेला आहे.

आजच्या परिस्थितीमध्ये भारतात समानतेचा धागा घेऊन चालणारे खूप कमी राजकीय व्यक्तींचा समावेश दिसून येतो इथल्या राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व दृष्ट्या नेतृत्वातून सर्वसमावेशक देश विकास करता येण्यासारखे आहे परंतु या घटकांचा फायदा देण्याचे कसं येथील राजकारण्यांमध्ये दिसून येत नाही. भारतात अलीकडे धर्मवेढा आणि धार्मिकतेचा बाजार मांडणाऱ्या व्यक्तींचा सुळसुळाट झालेला दिसून येतो अशी चर्चा सामान्य वाचक साहित्यिक शास्त्रज्ञ आणि आंदोलनात काम करणारे मंडळी यांच्याकडून ऐकावयास मिळत आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आणि अधिकाराचा अंतर्भाव करण्यात आला परंतु याकडे राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या व्यक्तींकडून त्याची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.

आजच्या परिस्थितीत राजकारणात खूप अशी बांडगुळ तयार होत असलेली दिसत आहे यांना कुठला विकास करणे उचित वाटत नाही, भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या राज्यघटनेच्या तत्त्वानुसार आणि नियमावलीनुसार जर का इथली राजकीय व्यक्ती कार्य केली असते तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात ए आय सारखी नवीन संकल्पना उदयाला आली नसती स्वर्गीय राजीव गांधी यांनी विज्ञानाचे संकल्पना राज्यघटनेतून घेऊन ते विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात सोन्याचा धूर निघत असेल म्हणूनच भारताला सोने की चिडिया म्हणून संबोधले जायचे इथल्या तथाकथित वेगळ्या विचारधारेची माणसं त्याचा धुरळाच केला आहे. आज घडीला राष्ट्र भांडवलदाराच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू असून भारत कधी सुजलाम सुफलाम राष्ट्र बनेल ते स्वप्न उराशी बाळगून असलेला इथला समाज विकसित कसा होईल त्याला मुठमाती देणारी माणसं धार्मिक तेढ निर्माण करून त्याचा प्रचार आणि प्रसार खूपच बोकाळलेला दिसत आहे जातीपातीचे राजकारण समाज विघटनाची प्रक्रिया एन केन प्रकारे केले जात आहे जात वंश हा परिपाठ खेड्यापाड्यांमध्ये दिसून येतोय याकडे कोणाचेही लक्ष नाही काय याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे हा मुद्दा प्रकर्षाने सर्वसामान्य माणसाच्या समोर आ वासून उभा आहे.

देशाला प्रथम राष्ट्र करण्याची मनीषा बाळगणारी मंडळी मुळेच संविधानाचा सखोल अभ्यास केल्याचे दिसत नाही मात्र या राष्ट्रात संविधान बचाव अशी आंदोलने करावे लागत आहेत देशातील सर्व समाज हे समजून घ्यायला तयार नाही राष्ट्राची प्रतिमा मोठी करण्याचे धाडस इथल्या राजकीय लढवयांमध्ये दिसत नाही परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मोरार्जी देसाई इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी तसेच विश्वनाथ प्रताप सिंग आणि निवडणूक आयोगाचे तत्कालीन प्रमुख टी एन सेशन सारख्या खुशाल प्रशासकांची आज भारताला गरज आहे. वास्तविक पाहता जातीय सलोखे निर्माण करण्याचे काम इथल्या संत परंपरेने केल्याचे आढळते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "दि प्रॉब्लेम ऑफ रुपी" या ग्रंथाचे लेखन केल्यानंतर त्या आधारेच देशाचे आर्थिक धोरण भक्कम झाले पाहिजे म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ची 1 एप्रिल 1935 रोजी स्थापना केली आणि इथले अर्थकारणच बदलून गेले हे कोणाला विसरता येणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महु या गावी झाला पण मुळ महाराष्ट्रातील असल्यामुळे भारताचे तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मशताब्दी वर्ष (1891-1991)असल्यामुळे इथल्या सर्व अनुयायींना आणि राजकीय स्थरातून प्रदीर्घ  मागणी होती म्हणून त्यांच्या 99 व्या जयंती निमित्ताने भारत सरकारने 31 मार्च 1990 रोजी "भारतरत्न" हा सन्मान बहाल करण्याचा निर्णय घेतला आणि 99 व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकट रामन यांच्या हस्ते डॉ. सविता आंबेडकर माईसाहेब यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय विकसनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बारीक-सारीक मुद्द्यांचा विचार करून तिथल्या शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकरी, गरीब समाजाच्या उत्थानासाठी प्रयत्न केल्याचे राज्यघटनेच्या पानापानावर दिसते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  त्याकाळी अनंत यातना सहन करून सर्वसमावेशक अशी शिदोरी संविधान राष्ट्राला स्वतः प्रत अर्पित केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला भक्कम अशी राज्यघटना देऊन इथल्या तमाम बांधवांना न्याय दिला आहे इथल्या न्यायव्यवस्थेने या संविधानाचे रक्षण करणे क्रमप्राप्त असले तरी भारत मुलखातील मूळनिवासी सह इतर सर्व धर्म समभावाच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करण्याची गरज आहे तरच भारत देश जागतिक पातळीवर अहिंसावादी राष्ट्र म्हणून संबोधले जाईल सम्राट अशोकाने संपूर्ण जगतात 84 हजार स्तूप स्थापन करून बौद्ध धम्माची शिकवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगात मध्ये भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बौद्ध राष्ट्र म्हणून होत असतो आणि समाजाच्या उत्थानासाठी भरीव अशी मदत भारताला करण्यात येते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर, छत्रपती राजर्षी शाहु महाराज आणि जोतीराव फुले यांच्या विचाराला गुरुस्थानी मानून वाटचाल केलेली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जागतिक कीर्तीचे विचारवंत म्हणून संबोधण्यात येते बाबासाहेबांनी तळागाळातील माणसांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि त्यांचा विकास होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती बळकटी झाली पाहिजे हा माणस उराशी बाळगून लेखणीच्या आधारे संविधानाच्या रूपाने राष्ट्रवीषणाचा केलेला प्रयत्न कोणत्याही व्यक्तीला विसरता येणार नाही. भारतातील न्यायव्यवस्थेकडून संपूर्ण राष्ट्राचा आणि येथील समाजात वावरणाऱ्या स्त्री-पुरुष समानतेचा धागा पकडून सर्व समावेशक विकास झाला पाहिजे ही धारणा होती.

_राजेंद्र नामदेव सूर्यवंशी, मु.पो. रावणगाव ता. उदगीर, जि. लातूर

Post a Comment

0 Comments