जिल्हा परिषदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
लातूर : जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याणचे सभापती उत्तम माने, कृषी व पशुसंवर्धन सभापती कविता गोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, बी डी वाघ, जावेद शेख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, गटविकास अधिकारी संतोष माने, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोहन इंगळे व कैलास आवटे यांनी बुद्ध वंदना गायली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत भावी पिढीने त्यांचा आदर्श घेण्याचे ही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सावंगीकर यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी मानले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सामाजिक समता सप्ताहाचा समारोप..
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व दिव्यांग सक्षमीकरण विभागात ८ एप्रिल पासून चालू असलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा समारोप ही करण्यात आला. या सप्ताहात आश्रमशाळा व दिव्यांग शाळेत विविध व्याख्याने, निबंध व विविध स्पर्धा तसेच संविधानाचेही वाटप घरोघरी करण्यात आले.


0 Comments