लातूर : लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी शाम मंगल कार्यालय, लातूर येथे सकाळी १०.०० वाजता पासून वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे मेळाव्याचे अध्यक्ष काशिनाथ मोरखंडे व जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील यांनी सांगितले. लिंगायत महासंघाच्यावतीने होणार्या या राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्यात लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचाही समावेश असणार आहे. जंगम, तेली, माळी, शिंपी, केष्टी, कुंभार आदिंनाही यात सहभागी होता येईल. तसेच घटस्फोटीत व विधवा-विधूर १०.०० वीरशैव यांनाही या कार्यक्रमात सहभागी होता येईल. महाराष्ट्राच्या विविध भागातून इंजिनिअर, डॉक्टर व उच्चशिक्षीत अनेक वधू-वर येणार असल्याने मनपसंद जोडीदार मिळविण्यासाठी पालकांसह वधू-वरांनी आपला बायोडाटा व दोन फोटो घेवून येणे आवश्यक आहे. या मेळाव्यासाठी अनेक धर्मगुरू व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या वधू-वर मेळाव्याची नाव नोंदणी अंबुजा भांडी स्टोअर्स, नेलवाडकर कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप औसा रोड, लातूर येथे गणेश चतुर्थी पासून सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी ९८९००९९७९२ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत काला पाटील व वधूवर मेळाव्याचे अध्यक्ष काशिनाथ मोरखंडे यांनी केले आहे. जोडीदार गार असल्यानात अनेक
0 Comments