२२ गुरुदासपूर - पंजाबमधील गुरुदासपूर येथील बटाला येथे बुधवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. आग लागल्यानंतर हा स्फोट झाला. या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. अनेकजण मलब्याखाली अडकले असून मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्फोट झाला तिथेच रहिवासी वस्ती असून काही घरांनाही स्फोटाचा फटका बसला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. चार वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून . काही २० जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनेवर बचावकार्य पथक घटनास्थळी दाखल झाल सुमारास असून बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी दिली बचावकार्य सुरु असून अनेकजण ढिगाऱ्याखाली असून (पान ४ वर)
0 Comments