लातूर:( प्रतिनिधी) ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सव शुक्रवार पासून प्रारंभ होत आहे गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकान मध्यरात्री 12 वाजता दर्शनास प्रारंभ झाला तर सकाळी सपत्नीक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री पूजा आणि झेंडावंदन होणार आह. दुपारी पारंपारिक झेंड्याच्या काठीची मिरवणूकही काढली जाणार आहे.यात्रा महोत्सवानिमित्त आठ मार्च पर्यंत दररोज विविध धार्मिक व समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाची लातूरकरांचा मराठवाड्यातील जनतेला उत्सुकता असते.गवळी समाजाच्या दुग्धाभिषेक खास शेकडो वर्षाची परंपरा आहे रात्री नऊ वाजता ज्ञानोबा माऊली महाराज आष्टेकर यांचे कीर्तन व अकरा वाजता रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन होणार आहे शनिवारी प्लास्टिक वापर टाळण्यासाठी प्रशासक श्रीमती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रॅली काढून दिली जाणार आहे . रविवारी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने श्री ना गंगाजलाभिषेक केला जाणार आहे . सोमवारी सकाळी शासकीय आरोग्य दालनाचे उद्घाटन होणार आहे. यात्रा कालावधीत दररोज भजन-कीर्तन संगीत आधी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. शनिवारी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे 8 मार्च रोजी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.
0 Comments