निटुर: (प्रतिनिधी) विद्यार्थी व विद्यार्थिंनीनी छञपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृृती पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या मंचावर बालकांनी आपल्या भाषणातून शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला.
शिवजयंती निमित्ताने निटूर येथे मारूती मंदिरात अर्पण रक्तपेठी व्दारा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक मोठा पायंडा पाडल्याचे यानिमित्ताने पाहावयास मिळाले एकंदर, निटूरमध्ये शिवजयंतीनिमित्ताने मोठा संकल्प झाल्याची चर्चा आहे.या शिबीरात विशेष म्हणजे निटूरचे उपसरपंच संगमेश्वर करंजे यांनी रक्तदान करून नविन संकल्पना साजरी केली.
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वक्तृृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यांना प्नथम,द्वितीय,तृृतीय या अनुषंगाने बक्षिस वितरण करण्यात आले.एकंदर, या कार्यक्रमास गावातील सरपंच परमेश्वर हासबे,खदिर गस्ते,सुशांत घाटके,राम साळुंके, राजकुमार सोनी, प्रेम काळे, मल्लिनाथ बुरकुले, प्रशांत पाटील सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments