Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामदैवत श्री सादनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची रांग

निटूर:(प्रतिनिधी) येथील पंचक्रोशीतील प्रसिध्द असणारे देवस्थान ग्रामदैवत श्री सादनाथ मंदिरात  महाशिवराञीनिमित्ताने परिसरातील पुरूष व महिला बालगोपाल भाविक भक्तांची सकाळपासूनच मांदियाळी दिसत होती.ग्रामदैवत श्री सादनाथ मंदिरात भाविक भक्तांनी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी अभिषेक आदि करून  देवापुठे साकडे घालून सर्वांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.गावकरयांनि येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळाची व्यवस्था केली होती.श्रींच्या चरणी भक्तगनांच्या  रांगा वाढतच गेल्या.आज मंदिरात महाशिवराञीनिमित्ताने जवळपास अडीचशे अभिषेक झाले.अभिषेक सपत्निक रूपात करण्यात आले.एकंदर, विश्वस्त समितीकडून गेल्या दिड वर्षापासून मंदिर परिसर सुशोभिकरणाच्या माध्यमातून तसेचगावातील अनेक सांप्रदायिक कार्यक्रमरूपाने नागरिकांसाठी श्रद्धेचे तसेच पर्यटनाचे पन केंद्रबिंदूच ठरत आहे.महाशिवराञीनिमित्ताने मंदिरातील व्यवस्थेमध्ये पंकज कुलकर्णी, विजय देशमुख, बाक़ृृष्ण डांगे, अनिल सोमवंशी,राजाभाऊ तापडीया,अंकुश कवडे, धोंडीराम बुरकुले, सुदर्शन जाधव आदि परिश्रम घेत आहेत.


Post a Comment

0 Comments