Latest News

6/recent/ticker-posts

पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य खुल्या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड व कर्मचाऱ्यांच्या वतीने तब्बल ५१००० हजार रुपयचे प्रथम पारितोषिक



देवणी :( प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करून समता स्वातंत्र बंधुता न्याय प्रस्थापित करणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे पोलिस
परंतु समाजात जेव्हा जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांना कठोर भूमिका घ्यावी लागते म्हणून पोलिस कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा असला तरी समाजाच्या सर्वांगीण हितासाठी  किती गरज असते देशात काही आणीबाणी अराजकता  निर्माण झाली छातीवर गोळी झेलण्यासाठी पोलिस पुढे असतात समाजाचे देशाचे खरे रक्षक पोलिस हेच आहेत त्याच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्यांच्यातून माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचा नक्कीच गुण गौरव करण्यात आला पाहिजे असे सर्व गुणसंपन्न  पोलिस निरीक्षक मा चितांबर कामठेवाड देवणी पोलिस स्थानकाला  लाभले आहे याना यांना सामाजिक. शैक्षणिक. क्रीडा  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आवड व बांधिलकी आहे म्हणून  ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा मिळाली म्हणून स्वतः व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून  साकेत क्रिकेट क्लब च्या वतीने  खुल्या टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करून तब्बल ५१००० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवले आहे यांच्यावरूनच कामठेवाड यांची सामाजिक क्रीडा क्षेत्रातील बांधिलकी दिसून येते त्यामुळे चितांबर कामठेवाड हे गुणगौरवास पात्र ठरले आहेत
चितांबर कामठेवाड हे देवणी पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून  तालुक्यात कोठेच कायदा सुव्यवस्थतेच प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत नाही देवणी पोलिस ठाण्यात कमी कर्मचारी असतानाही अगदी चांगल्या पद्धतीने  कर्मचारी यांच्याकडून कामे करून घेतली व  विविध अवैध धंद्याला आळा घालुन त्यांनी  आपले कर्तव्य बजावले आहे.
 आरोपींला व फिर्यादीला समोरासमोर बोलावून त्यांच्यातील गैरसमज दूर करून आपसात भांडण तंटे समजाऊन सांगून मिटवण्याचा प्रयत्न करतात व तसे ऐकत नसेल तर नाविलाजने खाकी दाखवून तरी सामाजिक बांधिलकी जोपासता येते का शेवटपर्यंत प्रयत्न करीत असतात तसे होतंच नसेल तर नाविलाजास्तव गुन्हा दाखल करावा लागतो अशी त्यांची कामाची पद्धत आहे त्यामुळे तालुक्यातील काही अंशी गुन्हयचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते
प्रशासकीय सेवेत असताना माणसाला काही प्रमाणात बंधने असतात त्यातूनही वेळालील वेळ काढून आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो त्यांची ऋण उतराई व्हावी म्हणून अपवाद पोलिस निरीक्षक कामठेवाड सारख्या अधिकारी यांच्या कडून अशी कामे होतात  त्यांना मनाचा मोठेपणा लागतो
आज २२ फेब्रुवारी रोजी या सामन्याची सुरुवात होणार आहे महाराष्टातील नामांकित टीम या सामन्यात उतरणार आहेत एवढ्या मोठ्या स्पर्धा प्रथमच देवणी शहरात होत आहेत  उत्तम अशी मेजवानी प्रेक्षकांना  बघण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे  देवणी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे शशिकांत चिद्रे  .अभिजित हुडे .अमर पाटील .डॉ पठाण यांच्याकडून अनेक मोठमोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत या स्पर्धा लांडगे मंगल कार्यालय यांच्या समोरील मैदानावर होणार आहेत यांचा मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे  या स्पर्धा आयोजित केल्यामुळे सर्व स्थरातून पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment

0 Comments