Latest News

6/recent/ticker-posts

लातूर विभागीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धा

नांदेड: (प्रतिनिधी) लातूर विभागीय ट्रॅडिशनल रेसलिंग (बेल्ट व मास) क्रीडा स्पर्धेचे स्टेट ट्रेडिशनल रेसलिंग आसोसिएशन महाराष्ट्र व नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन च्या वतीने भोकर येथील के.एन.फंक्शन हॉल मध्ये सदरील स्पर्धा घेण्यात आली.नगरसेविका डॉ.अनिता राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष उत्तम बाबळे,सचिव सिद्धार्थ जाधव, मुदखेड तालुका प्रसिद्धी प्रमुख पिराजी एल.गाडेकर,दिगंबर टिप्परसे,मारोती लोनवडे स्पर्धा आयोजन प्रमुख संदिप पाटील कोंडलवार नांदेड जिल्हा हौशी अँथेलेटिक्स संघटना असोसिएशन नांदेड चे सचिव प्रलोभ एम.कुलकर्णी,बिंदू महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.व्यंकट माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व  पिक्चर बाजार समिती संचालक निलेशभाऊ देशमुख बारडकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्हा ट्रेडिशनल रेसलिंग आसो.चे सहसचिव बालाजी एल.गाडेकर यांच्या नेत्रुत्वाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.या मध्ये नांदेड जिल्ह्यातून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना पदक,ट्रॉफी व प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजयी खेळाडूंची पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सुधा डी.ऐडके,विशाल गायकवाड,नितीन देडे,कु.पार्वती चव्हाण, कु.सलोनी सुरदसे,कु.राणी जाधव,सुनिल पवार,किरण नांदेड, बापुराव धमने,सुमित सुरदसे,साई करपे यांनी पंच म्हणून काम पाहिले.


Post a Comment

0 Comments