Latest News

6/recent/ticker-posts

शादिखाना बांधकाम स्थळास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भेट

लातूर:(प्रतिनिधी) फ्रूट मार्केट शादिखाना बांधकाम स्थळास अमित विलासराव देशमुख यांची भेट, कामाची केली पाहणी संबंधितांना केल्या सूचना.राज्य शासनाच्या वतीने लातूर शहरातील फ्रूट मार्केट भागात उभारण्यात येत असलेल्या  शादिखाना बांधकाम स्थळास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख १० मार्च रोजी दुपारी भेट देऊन शादिखाना बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची संबंधित कामाची आर्किटेक्ट व कंत्राटदार यांच्याकडून ना.अमित विलासराव देशमुख यांनी माहिती घेऊन आवश्यक सूचना यावेळी केल्या.यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोईज शेख, आर्किटेक्ट सज्जाद लोदी, कंत्राटदार सत्तार शेख, समद पटेल,अहमदखान पठाण,कैलास कांबळे,आसिफ बागवान, सिकंदर पटेल, युनूस मोमीन, इम्रान सय्यद, जब्बार पठाण, मुब्बशर टाके, आदील शेख, नजीर मुजावर, तब्रेज तांबोळी, युसुफ बाटलीवाले,देविदास बोरुळे पाटील, दिलीप चिद्रे यांच्यासह जिल्हा व मनपा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments