Latest News

6/recent/ticker-posts

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मिटविली  सीमेवरील भारतीय जवानाच्या आईच्या उपचाराची चिंता

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मिटविली 
सीमेवरील भारतीय जवानाच्या आईच्या उपचाराची चिंता


लातूर:(प्रतिनिधी) भारतीय सीमेवरील देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानाच्या वयोवृद्ध आई सरूबाई मुळे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पुढील उपचारासाठी ते चिंतेत होते. सदरील अडचणीची माहिती कळताच लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधितांना या उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन खऱ्या अर्थाने पालकत्व निभावले आहे.
 लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सारणी येथील रहिवाशी असलेल्या सरूबाई गणपत मुळे यांच्या डोळ्यावर जवळपास ४० दिवसापूर्वी डोळ्याची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र वयोवृद्ध सरूबाई मुळे यांचा मुलगा भारत चीन सीमेवर सेवा बजावत असल्याने व सध्या कोरोना संसर्गामुळे सबंध देशभरात लॉकडाऊन असल्याने पुढील उपचारासाठी आडचणी येत होत्या. तसेच जवान खंडू मुळे यांच्या लातूर मधील घरातील सिलेंडर साठी देखील एटीएम बंद असल्याने त्यांच्या पत्नीची होणारी गैरसोय व सरूबाई मुळे उपचारासाठी सारणी गावातून लातूरला येऊ शकत नसल्याने त्यांच्यावर पुढील उपचार मिळण्यात देखील आडचन निर्माण झाली होती. सीमेवर सेवा बंद होणाऱ्या खंडू मोरे यांनी यासंदर्भात पालकमंत्र्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली होती. पालकमंत्री देशमुख यांनी या विनंतीची तात्काळ दखल घेऊन स्वीय सहाय्यक श्रीकांत सोनवणे यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले त्यानंतर सरूबाई मुळे यांना रुग्णवाहिका द्वारे लातूर येथे आणून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टर उदय मोहिते यांच्या माध्यमातून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले आहेत एवढ्यावरच न थांबता मुळे यांच्या घरी गॅस सिलेंडर व इतर काही अडचणही  तात्काळ दूर करण्यात आल्या आहे.


Post a Comment

0 Comments