Latest News

6/recent/ticker-posts

अफसर शेख युवा मंचच्या वतीने पोलिस ठाण्यात सॅनिटायझर कक्ष

अफसर शेख युवा मंचच्या वतीने पोलिस ठाण्यात सॅनिटायझर कक्ष


औसा:(प्रतिनिधी:सय्यद नदीम) कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी येथील अफसरशेख युवा मंचने पुढाकार घेऊन स्वखर्चातून सॅनिटायझर कक्ष निर्माण केले आहे.त्याचा पोलीस प्रशासनासह नागरिकांना लाभ होत आहे त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे त्यामुळे शासन, प्रशासन व विविध संस्था, संघटनांच्या वतीने मदत करण्यात येत आहे.तसेच येथील अफसरशेख युवा मंचनेही हातावर पोट असलेल्या गरजू,गरीब कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूची मदत केली आहे. दरम्यान जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटायझर कक्ष पोलीस ठाण्यात उभारले आहे तसेच शहरात प्रवेश करण्यासाठी औसा- लातूर टी पॉइंट वर मुख्य चौकात सॅनिटायझर कक्ष उभारला असून तिचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments