औसा कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू;फोन,अँप द्वारे करावी लागणार नोंदणी
औसा:(प्रतिनिधी:सय्यद नदीम) कोरोना विषाणूमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती लॉक डाऊनच्या काळात बंद करण्यात आलेल्या होत्या परंतु लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र माने आणि जिल्हा निबंधक सहकारी संस्था लातूर यांची संयुक्त बैठक होऊन लातूर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती औसा व उपबाजार पेठ किल्लारी येथे शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करण्यासाठी बाजार समितीचे व्यवहार सुरू करण्यात येत आहेत परंतु शेतकऱ्यांना यापुढे फोन किंवा मोबाईल ॲप द्वारे शेतमाल विक्री करण्यासाठी नोंदणी करावी लागणार असून शेतकऱ्यांनी फोन किंवा ॲप द्वारे याठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे ,त्यासाठी शेतकऱ्यांनी फोन किंवा मोबाईल ॲप्स चा वापर यापुढे करावा असे असा निर्णय घेण्यात आलेला आहे ,लॉक डाऊनच्या पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या मालाचा सौदा दि, २१ एप्रिल रोजी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आला असून दिनांक २३ एप्रिल पासून दैनंदिन १४ व शेतमालाचे व्यवहार सुरू होणार आहेत तरी औसा तालुक्यातील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की लॉक डाऊन त्यादरम्यान औसा व किल्लारी बाजार समिती आवारातील गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाची नोंदणी मोबाईल किंवा फोन द्वारे नोंदणी करण्यासाठी मुख्य बाजार समिती औसा येथे भुजंग सोमवंशी मोबाईल नंबर ९९२१६१८७५१ या क्रमांकावर व उपबाजारपेठ किल्लारी साठी आजमुद्दिन शेख मोबाईल नंबर ९६३७०१९१४० या क्रमांकावर संपर्क साधावा ,औसा व किल्लारी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सकाळी ११,३० ते सायं ५:०० वाजेपर्यंत फोन किंवा मोबाईल ॲप द्वारे आपल्या शेतमालाची नोंदणी करावी, नोंदणीनंतर ज्या क्रमाने नोंदणी होईल त्या क्रमाने बाजार समितीमध्ये त्या सर्वांची छाननी करून शेतमाल घेऊन येण्यासाठी शेतकऱ्यांना कळविण्यात येणार आहे, शेतकऱ्यांनी दिलेल्या तारखेला व दिलेल्या वेळेत सकाळी ११:३० वाजेपर्यंत शेतमाल बाजार समितीमध्ये घेऊन यावा ,कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विना नोंदणी किंवा इतर वेळेला शेतकऱ्यांना कोणासहि बाजार समिती आवारात प्रवेश दिला जाणार नाही याची शेतकऱ्यांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, फोन किंवा ॲप द्वारे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी स्विकारला जाणार आहे, बाजार समिती आवारात प्रवेश करताना शेतकऱ्यांनी हात धुण्याच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याठिकाणी स्वच्छ हात धुऊन मार्केट यार्ड मध्ये प्रवेश करताना तोंडाला मास्क बांधूनच प्रवेश करावा, शेतकऱ्यांनी बाजार आवारात एकमेकापासून ५ ते ६ फूट अंतर पाळावे एका वाहनात एकच शेतकरी असावा दररोज मर्यादित स्वरुपात आवक नोंदवली जाईल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शेतकरी बंधूनी नोंदणीच्या वेळी दिलेल्या मोबाईल नंबर वर संदेश फोन किंवा व्हाट्सअप द्वारे शेतीमाल आणण्यासाठी दिनांक वेळ कळविण्यात येईल त्यानंतरच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल दिलेल्या तारखेला वेळेत बाजारात आणावा इतर वेळी आलेला शेतमाल किंवा विना नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments