लातूर बाजार समिती सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन सुरु;सौद्यास झाला प्रारंभ
लॉकडाऊन काळात सुरु होणारी राज्यातील पहिली बाजार समिती
लातूर:(प्रतिनिधी) देशात कोरोनाच्या वाढत्या विषाणुमुळे गेल्या अनेक दिवसापासून राज्यात लॉकडाऊन आसल्याने सर्वत्र बाजार समिती बंद आहेत.त्यामूळे जीवनावश्यक वस्तुचा तुटवडा जाणवत होता त्यातच शेतकरी चिंतेत होता लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती आज २१ एप्रील रोजी सुरक्षित अंतर ठेऊन मंगळवारी सुरु करण्यात आली असुन आज तुरीचा सौदा करण्यात आला आहे. लॉक डाऊन काळात राज्यात सुरु होणारी लातूरची बाजार समिती ही पहिली ठरली आहे यामुळे आज शेतकरी वर्गाना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात व राज्यात काही जिल्हयात शेती विषयी उद्घोग,व्यवहार सुरक्षित अंतर ठेऊन सुरु करण्यास परवानगी सरकारने दिली असुन त्यात लातूरचा समावेश आहे.बाजार समितीचे सभापती ललित कुमार शहा यांच्या सुचनेनुसार बाजार समितीचा सौदा सुरु करण्यात आला केवळ ५० शेतकरी वाहनास सुरक्षित अंतर ठेऊन बाजार आवारात प्रवेश देण्यात आला. यावेळी बाजार समितीने सौद्याच्या ठिकाणी ३ मिटर सुरक्षित अंतर ठेऊन सौदा पार पाडला आहे. यासाठी पोलिस, जिल्हा प्रशासन,बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, प्रभारी सचिव सतिश भोसले, संचालक मंडळ बाजार समितीचे अधिकारी,कर्मचारी यानी परिश्रम घेतले.
0 Comments